Operation Tiger: ठाकरे सेना पुन्हा फुटणार ? 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

Operation Tiger: काल मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार आमदार गैरहजर होते.

Eknath Shinde

Eknath Shinde

Operation Tiger: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. या धक्केतून ठाकरेसेना सावरण्याच्या प्रयत्नात असताना एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडण्याचे मिशन सुरू आहे. खासदारांप्रमाणेच आमदारांची ऑपरेशन टायगर (Operation Tiger) राबविण्यास सुरुवात झाल्याची राजकीय चर्चा सुरू झाले आहेत.

काल मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार आमदार गैरहजर होते. त्यानंतर गुरुवारी राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेसेनेतील चौदा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले आहेत. पावसाळी अधिवेशन असल्याने सर्वच आमदार हे मुंबईत आहेत. हे आमदार बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. त्यानंतर चौदाही आमदार हे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. त्यातील चौदा आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे हे आमदार फुटण्याची शक्यता आहे.


मोआना लाईव्ह-अॅक्शन चित्रपट 10 जुलै रोजी इंग्रजी आणि हिंदी भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

ठाकरेसेनेचे खासदार फुटण्यापूर्वी काही शिंदे यांच्या आमदारांनी ठाकरे यांचे आमदारही फुटणार आहेत, असा दावा करण्यात आला होता. त्यात संख्याचा फरक होता. काही जण बारा आमदार फुटणार असे म्हणत होते. परंतु प्रत्यक्षात आमदार फुटीचा संख्या 14 पर्यंत जाऊ शकते, असे दिसून येत आहे.


लाजा वाटल्या पाहिजे भ XXXव्यांना; उशीरा चपाती दिल्याने साई प्रसादालयात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राडा !


आपण खरोखर एकत्र आहोत का?उद्धव ठाकरेंचा सवाल

बुधवारी संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीताला महाविकास आघाडीचे 60 पैकी 23 आमदार गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेही बैठकीला अनुपस्थित होते. दोघेही वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले.याशिवाय काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हेही बैठकीला गैरहजर होते. वडेट्टीवार आजारी असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावरच आपण खरोखर एकत्र आहोत का ? असा सवाल ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर ठाकरे यांचे चौदा आमदार हे शिंदेंच्या संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version