Operation Tiger : ठाकरे गटाला मोठा धक्का: बैठकीकडे 6 खासदारांची पाठ, फुटीवर शिक्कामोर्तब!
Operation Tiger : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
Operation Tiger : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली येथे आयोजित संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांनी पाठ फिरवली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला यश मिळाले असल्याची देखील आता जोराने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
तर दुसरीकडे आज दिल्ली येथे आयोजित ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीत राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह लोकसभा खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) , अनिल देसाई (Anil Desai) , राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) उपस्थित आहे. तर जे या बैठकीत येणार ते आमचे आणि जे बैठकीत येणार नाही ते बेइमान आणि गद्दार असं संजय राऊत म्हणाले आहे.
इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही – संजय राऊत
तर संजय राऊत यांनी एका एक्सपोस्टमध्ये आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते,पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. सध्याच राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते!त्या अधिक प्रामाणिक असतात. महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही असं देखील म्हटलं आहे.
लव जिहाद! ‘त्या’ नराधमचे कुटुंब या ठिकाणी दिसायला नको… आमदार जगताप संतापले
आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते:
पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते!
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते:
सध्याच राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते!त्या अधिक प्रामाणिक असतात ।
(महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही)
जय…— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2026
ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोण?
परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असा दावा करण्यात येत आहे.