लव जिहाद! ‘त्या’ नराधमचे कुटुंब या ठिकाणी दिसायला नको… आमदार जगताप संतापले

Sangram Jagtap : अल्पवयीन तरुणीला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या सोहेल शेख या आरोपीच्या विरोधात राष्ट्रवादीचे अजित

Sangram Jagtap

Sangram Jagtap : अल्पवयीन तरुणीला वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या सोहेल शेख या आरोपीच्या विरोधात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी शेवगावमध्ये मोर्चा काढला. संबंधित आरोपीला तसेच त्याच्या कुटुंबीयांना या ठिकाणी राहू देऊ नका तसेच रेशनकार्ड वरील त्यांचे नाव देखील काढले गेले पाहिजे अशा शब्दात आमदार जगताप यांनी संताप व्यक्त केला.

तसेच यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली कारण एका जिहादीने तिला धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त केले. देशांमध्ये लव्ह जिहाद सारख्या घटना या घडतच आहे. अशा घटना रोखण्यासाठी व संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आज शेवगाव शहरांमध्ये हिंदूंचा मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाचा मोर्चा जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये संबंधित आरोपीला अटक झाली. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींना देखील अटक केली जावी अशी देखील मागणी आहे अशा केसेस फास्टट्रॅक वरती घेतल्या जावे यासाठी आम्ही मागणी करणार आहोत असा जगताप म्हणाले.

लव जिहाद सारख्या घटना रोखण्यासाठी कायदा झाला आहे मात्र अनेक राज्यांमध्ये या घटना घडतच आहे मात्र अशा कृत्य करणाऱ्या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते तसेच कुटुंबियांनी  देखील आपल्या पाल्यांमध्ये जागृती केली पाहिजे असं देखील यावेळी आमदार जगताप म्हणाले.

त्या खासदाराचा कोथळा बाहेर काढावा लागणार

आयटी सेक्टर मध्ये आयटी जिहाद पाहायला मिळाला. जिहाद्यांकडून घडलेल्या घटना या काही मुलींनी समोर आणल्या त्यानंतर सर्वांना हे समजलं. नाशिक जिल्ह्यापुरतं ते प्रकरण थांबता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचे पडसाद उमटले व हे प्रकरण संभाजीनगरच्या त्या माजी खासदाराच्या गळ्यापर्यंत आलं मात्र आता असं प्रकरण त्याच्या गळ्यापर्यंत नाही तर आता त्याचा कोथळा आपल्याला बाहेर काढावा लागेल अशा शब्दात आमदार जगताप यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती निशाणा साधला.

‘ऑपरेशन टायगर’ संभ्रम कायम; 19 जून नाही आता ‘या’ दिवशी होणार विलिनीकरणाची घोषणा –

नेमकं प्रकरण काय ?

शेवगाव शहरातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन पीडित तरुणीला संबंधित आरोपी शेख याने फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून वारंवार मानसिक त्रास देत होता. आरोपीकडून होत असलेल्या या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून अखेर त्या अल्पवयीन मुलीने ११ जून २०२६ रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. फरार झालेल्या मुख्य आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करण्यात मोठे यश मिळवले.

follow us