‘ऑपरेशन टायगर’ संभ्रम कायम; 19 जून नाही आता ‘या’ दिवशी होणार विलिनीकरणाची घोषणा

Operation Tiger : राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनअंर्गत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील

Operation Tiger

Operation Tiger : राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनअंर्गत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडले असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असं सांगतिलं जात आहे तर आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या अपडेटनुसार,सहा खासदारांचा शिवसेनेत (Shivsena) पक्ष प्रवेश 19 जून रोजी होणार नाही. काही तांत्रिक आणि कायदेशीर शिल्लक असल्याने ऑपरेशन टायगर पुढे ढकलला जाण्याची शक्यता असून 21 जूननंतर खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आता माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र्य गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र देखील दिले आहे. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका असं उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या नेत्यांना सांगण्यात आले आहे.

19 जूनला विलिनीकरण सोहळा

तर दुसरीकडे ठाकरे गटातील सहा खासदार 19 जूनरोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सुरुवातीला सांगितलं जात होते मात्र आता काही तंत्रिक आणि कायदेशीर बाबीमुळे हा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. सहा खासदार 21 जून रोजी पक्ष प्रवेश करणार असल्याची आता माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेश टायगरबाबत (Operation Tiger) संभ्रम कायम आहे.

शिवसेना ठाकरे गटाची आज संसदीय बैठक

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना आज (18 जून) रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाकडून संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी पक्षातील सर्व खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आले आहे. सहा पैकी दोन खासदार एकनाथ शिंदे यांच्यासबोत जाणार नाही असा विश्वास ठाकरे गटाला असल्याने या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या 14 कलमी करार-

उद्धव ठाकरेंना सोडणारे खासदार

खासदार संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असल्याचा दावा राज्यातील राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

follow us