निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi On Opposition : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) झालेल्या पराभवांमुळे विरोधक जनतेची

Narendra Modi On Opposition

Narendra Modi On Opposition

Narendra Modi On Opposition : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) झालेल्या पराभवांमुळे विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ओडिशा युनिटने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना विरोधकांवर केली. तसेच विरोधक जनतेची दिशाभूल करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला आहे आणि हीच भाजपची खासियत आहे. तर भाजप सरकार विरोधात विरोधक सकाळ – संध्याकाळ खोटा प्रचार करत आहे. मात्र तरीही देखील भाजपचा काम पाहून जनता भाजपला बहुमत देत आहे. काही महिन्यापूर्वी राजकीय तज्ज्ञ ओडिशामध्ये भाजप कधीही स्वबळावर जिंकू शकत नाही असं म्हणत होते मात्र आम्ही स्वबळावर ओडिशा विधानसभा जिंकली असं मोदी म्हणाले.

नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत, 850 कोटींची कायदेशीर नोटीस, जाणून घ्या प्रकरण

तर विरोधकांवर टीका करत मोदी म्हणाले की, देशाला चुकीच्या दिशेने नेण्यासाठी विरोधकांनी जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. त्यांचे खोटे आणि अफवांचे दुकान 50-60 वर्षांपासून सुरू आहे पण त्यांनी आता भाजप सरकार विरोधात आणखी जोराने खोटा प्रचार करत आहे. त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. असेही या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर जगात भारताचा प्रभाव वाढला आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.

विकासाच्या मुद्द्यावर आमदार बापूसाहेब पठारे ॲक्शन मोडवर, अतिरिक्त महापालिका आयुक्तांसोबत मतदारसंघाची पाहणी

Exit mobile version