Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळल्या. दरम्यान, यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकावर जोरदार टीका केली.
INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews
8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्र सरकारने यात कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीच्या घोषणेप्रमाणे केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. यासंदर्भात ट्विट करत वडेट्टीवार यांनी लिहिलं की, स्वत:च्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी उठवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वत: श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचं आता उघड झाले आहे. गाजावाज करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का? असा सवाल वडेट्टीवारांनी केली.
स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपने लक्ष द्यावे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 21, 2024
त्यांनी पुढं लिहिलं की, निर्यातबंदी उठवण्यात आलेली नाही. सध्यस्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असं केंद्राकडून केंद्राकडून सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अन्यथा शासनाचा बुरखा फाडू; वाळू वाहतूक धोरणावरून तनपुरेंचा थेट इशारा
स्वत:च्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपने लक्ष द्यावं, असंही वडेट्टीवार म्हणाले.
कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवली नाही तर…
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असून कांदा निर्यातबंदी उठवलीच नव्हती. मात्र या घोषणेने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची अधिकृत अधिसूचना येत नाही, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवली नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतपेटीतून याचे उत्तर देतील, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.
व्यापाऱ्यांना तारा अन् शेतकऱ्यांना मारा
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कांदा निर्यातबंदीवरून भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कांदा निर्यातीवरील बंदी उठताच काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. पण निर्यातीवरील बंदी उठविण्यात आलेली नाही. व्यापाऱ्यांना तारा अन् शेतकऱ्यांना मारा, असं सरकारचं धोरण असल्याची टीका त्यांनी केली.