Download App

आजचा अध्यादेश ही बनवाबनवी, मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ.., वडेट्टीवारांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : मराठा समाजाला आरक्ष (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळली नाही. आज काढलेला अध्यादेश हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन फसवण्यासाठी केलेली बनवाबनवी आहे, अशी टीका त्यांनी केली.

Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी ठरला ग्रँड स्लॅम चॅम्पियन

मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मोठा लढा दिला. मराठ्यांना ओबीसी दाखले देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळं राज्यातील वातावरण चांगलचं तापलं होतं. याकाळात मराठा विरुध्द ओबीसी हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. दरम्यान, आज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. यावरून विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहित सरकावर टीका केली. त्यांनी लिहिलं की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळली नाही, अशी टीका त्यांनी केली.

धक्कादायक घटना! वकील पत्र घेतलेल्या आरोपीने खंडणीसाठी वकील दाम्पत्याला संपवलं  

आज मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे. सरकारचा अध्यादेश हा कायद्याच्या कसोटीत न बसणारा आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन फसवण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरं काही नाही, अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी पुढं लिहिलं की, सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र, आजची सूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवा बनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचं पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नये. ही बनवा-बनवी ओबीसी आणि मराठा समाज सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

follow us

वेब स्टोरीज