Naveen Patnaik : भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी विरोधक एकमेंकाच्या भेटीगाठी घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबईत होते. त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. परंतु त्याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोणत्याच पक्षाबरोबर जाणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सरकारला धोका नाही पण लढाई संपलेली नाही; Ujjwal Nikam यांचे विश्लेषण
बीजू जनता दल येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढणार आहे. कोणत्या राजकीय आघाडी बरोबर जाणार नाही, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपविरोधात एकजुटीसाठी प्रयत्न करत असलेल्या नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यापासून पटनायक हे आताच दूर झाले आहेत. त्यामुळे विरोधकांची एकजूट होण्यापूर्वीच हा मोठा झटका बसला आहे.
अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितले कारण…
नवीन पटनायक यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पटनायक म्हणाले, नवीन जे राजकीय समिकरणे, आघाड्या बनत आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही सामील होणार नाही. पंतप्रधान यांना भेटलो आहे. परंतु कोणतीही राजकीय चर्चा झालेलीनाही.पंतप्रधानांसोबतच्या भेटीत मुख्य चर्चा पुरी येथील प्रस्तावित श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत होती. पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
सत्तासंघर्षाच्या ‘सुप्रीम’ निकालानंतर राधाकृष्ण विखेंचा ठाकरेंवर घणाघात
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. त्याबाबत पटनायक म्हणाले, तो एक राजशिष्टाचाराचा भाग होता. नितीश कुमार यांना मला भेटायचे होते आणि आम्ही एकमेकांची भेट घेतली.
.