Maharashtra Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वात जास्त पाहायला मिळाला तो मुद्दा म्हणजे जातीय संघर्षाचा. कारण लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन सुरू केलं होतं. ते राज्यभर नाही तर देशभरात गाजलं. पुढे हे आंदोलन मुंबईतही आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 10 टक्के आरक्षण दिलं असं जाहीर केलं. मात्र, यामध्ये अंतिम काही निर्णय झालं नाही. दरम्यानच्या काळात राज्यभरात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला. त्यामध्येच लोकसभा निवडणुका झाल्या. त्याचा थेट परिणाम निवडणुकांमध्ये दिसून आला असून राज्यातील 48 खासदारांमध्ये तब्बल 26 खासदार हे मराठा आहेत. त्यावरून राज्यात 50 टक्क्यांहून अधिक खासदार मराठा समाजाचं असल्याचं समोर आलं आहे. तर यामध्ये 9 खासदार ओबीसी, अनुसूचित जातीचे 6 तर अनुसूचित जमातीचे चार खुल्या प्रवर्गातून 3 खासदार निवडून आले आहेत.
ही दुर्दैवी परिस्थिती
यामध्ये ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार मानला जातो. पण या वेळेस त्यात काहीसा बदल पाहायला मिळत आहे. म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडून ओबीसीचे जास्त खासदार झालेले दिसताय. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणं निर्णायक ठरतील असा अंदाज वर्तवला जात होता. तशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत दिसून आलं आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ही दुर्दैवी परिस्थिती असल्याचं म्हणत महाराष्ट्रात सुरुवातीपासून राजकारणात मराठा वर्चस्व राहिला असून तो कायम राहिल्याचं मत व्यक्त केलं आहे.
स्वतःला ओबीसी म्हणत नाहीत
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मराठ्यांचा वर्चस्व असून तिथे तर ओबीसीला मानाच स्थानही नाही. तसंच, ओबीसी समाज मध्यमवर्गीय असल्याने तो एवढी मोठी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळेच राज्यातील अनेक भागात मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत होते आणि मराठा खासदारांची संख्या जास्तच राहते असं मतही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, हळूहळू मात्र या स्थितीत बदल होतील. आज 48 पैकी 12 ते 13 खासदार ओबीसी आहेत. यामध्ये काहीजण ओबीसी असूनसुद्धा ही ते राजकारणापायी स्वतःला ओबीसी म्हणत नाहीत. ते जनतेसमोर जाताना स्वतःला मराठा म्हणूनच जातात हे आमचे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसंच, राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम जाणवला असंही तायवाडे म्हणाले आहेत.
मराठा समाजाचे खासदार
ओबीसी खासदार
खुल्या वर्गातील खासदार
अनुसूचित जातींचे खासदार
अनुसूचित जमातींचे खासदार
महत्त्वाचे मुद्दे