Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्यसभेच्या तोंडावर मोठं भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, राज्यसभा की लोकसभा हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे मला कुठे जायला आवडेल? यापेक्षा लोकांना मला कुठे बघायला आवडेल? राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे.
कतारमध्ये फाशी सुनावलेल्या माजी नौसैनिकांची सुटका; मोदी सरकारच्या कूटनीतीला यश
यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. यातच आता भाजपात काहीशा दुर्लक्षित झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवणार का? या माध्यमातून त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर बीडमध्ये एका कार्यक्रमात पंकजा यांनी उत्तर दिले आहे.
आता तलाठी पद नसणार, ग्राम महसूल अधिकारी म्हणायचं; महसूलमंत्र्यांची घोषणा
रविवारी पंकजा मुंडे या बीडमधील नारायण गडावर गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोंडूळ या गावामध्ये भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोक अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते ही चर्चा होऊनही सहाजिक आहे. त्यामुळे मला त्याचं काही नाविन्य वाटत नाही.
लोकांना आणि माध्यमांना वाटतं की, मी कित्येक दिवसांपासून एखाद्या पदाच्या प्रतीक्षेत आहे. तसेच याप्रमाणे इतर माझी विधानसभा विधान परिषद सदस्यांना कुठे ना कुठेतरी पद मिळतं. त्यानुसार माझ्या नावाची चर्चा होते. मात्र या तीन पक्षांच्या सरकारमुळे मला मतदारसंघ शिल्लक राहिलेला नाही. तसेच यावेळी पंकजा यांना संधी मिळाल्यास राज्यसभेवर जाणार की, लोकसभेवर असा प्रश्न विचारल्यास त्या म्हणाल्या की, राज्यसभा की लोकसभा हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे मला कुठे जायला आवडेल? यापेक्षा लोकांना मला कुठे बघायला आवडेल? हे जास्त महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.