कतारमध्ये फाशी सुनावलेल्या माजी नौसैनिकांची सुटका; मोदी सरकारच्या कूटनीतीला यश
Indian Ex navy officers released : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी नौ सैनिकांची सुटका (Indian Ex navy officers released) करण्यात भारताला मोठे यश मिळालं आहे. यातील आठ पैकी सात अधिकारी मायदेशी सुखरूप परतले गेले आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली होती. मात्र त्यांची सुटका करण्यात मोदी सरकारच्या कूटनीतीला यश आले आहे.
आता तलाठी पद नसणार, ग्राम महसूल अधिकारी म्हणायचं; महसूलमंत्र्यांची घोषणा
हेरगिरी प्रकरणात गतवर्षी आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आले होते. तेव्हापासून हे सर्वजण तुरुंगातच होते. त्यानंतर कतारमधील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने मुत्सद्देगिरीचा वापर करत या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. यानंतर कतार सरकारकडून सर्वांची फाशी जन्मठेपेच्या शिक्षेत बदलली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
कतारमध्ये अल दाहरा या खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. पूर्णेंदू तिवारी, सुगुनाकर पाकला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंग गिल, बिरेंद्र कुमार वर्मा, सौरभ वशिष्ठ आणि रागेश गोपकुमार अशी अटक केलेल्या आठ अधिकाऱ्यांची नावे आहेत. कतार येथील एका गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होते.
गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहे. दरम्यान कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने या माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणामध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आले होते. त्यानंर आता फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी नौ सैनिकांची सुटका (Indian Ex navy officers released) करण्यात भारताला मोठे यश मिळालं आहे.