Pankaja Munde on Devendra Fadnavis :
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्र पक्ष दुरावल्याचे दिसून येत आहे. 2014 साली महायुतीची मोट बांधताना दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रिपाईचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर हे यांना सोबत घेतले होते.
या मित्रांच्या मदतीने 2014 साली भाजपाला मोठं यश मिळाले होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हे सर्व नेते भाजपपासून दुरावले आहेत. यावरुनच “ज्यांनी सत्ता आणायला साथ दिली ते आता सोबत नाहीत” असं म्हणतं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
MLA Rohit Pawar : अहमदनगरच्या नामांतराचं राजकारण करु नका…
पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या निधनानंतर राजू शेट्टी, विनायक मेटे, रामदास आठवले, महादेव जाणकर या नेत्यांना आमच्यासोबत राहाण्यासाठी हात जोडून विनंती केली होती. त्यावेळी मी कोअर कमिटीमध्ये होते. त्यामध्ये माझा वाटा मोठा होता. आमच्या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढली आहे असा आमच्या नेत्यांचा सर्व्हे आहे.
पण हे नेते जेव्हा आपली सत्ता येण्याची शक्यता नव्हती त्यावेळी आपल्यासोबत होते. आता त्या नेत्यांनाही सोबत घेतलं पाहिजे, त्यांनाही सन्मानाने स्थान दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील नेते आता तसा निर्णय घेतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मुंडे पुढे म्हणाल्या, महादेव जानकरांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे आग्रह धरला होता. जानकरांना कॅबिनेट मंत्री बनविण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. आणि ते मी पूर्ण करून दाखवले. मी जानकर यांना राज्यमंत्री पद नाही तर कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं पाहिजे असा आग्रह धरला होता. त्यामुळे जानकरांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं.