Download App

Pankaja Munde : ‘तुमचं प्रेम हेच आशीर्वाद पण, पैसे पाठवू नका’; पंकजांची भावनिक साद

Pankaja Munde : भाजपातून काहीशा साइडलाइन झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्यांनी राज्यभरात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. या यात्रेला प्रतिसादही चांगलाच मिळाला. जनमानस पंकजा मुंडे यांच्या बाजूने होत असल्याचे दिसत असतानाच त्यांच्या कारखान्याला जीएसटीने तब्बल 19 कोटींच्या थकबाकीची नोटीस धाडली. राजकारणात फारशा सक्रिय नसल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यातही अस्वस्थता पसरली आहे. तरी देखील आपल्या नेत्यांवर आलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत. पंकजा मुंडेंना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यावर आता स्वतः पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajit Pawar : अजितदादांचं ‘राजकीय आजारपण’ दूर; अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलचं

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची थकबाकी भरण्यासाठी नागरिकच पुढे आले असून एकाच दिवसात तब्बल दीड कोटी रुपये जमा केले. आतापर्यंत पाच ते सात कोटी रुपये जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं प्रेम पाहून पंकजांना गहिवरून आलं. त्यांनी मदतीचे चेक पाठवू नका असे सांगितले.  तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी आशीर्वाद आहेत हेच आशीर्वाद मला पाहिजेत असे पंकजा म्हणाल्या.

माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील बँकेसाठी तुमची प्रेमरुपी ठेव मला मिळावी. मात्र, आपण जी रक्कम मदतनिधी म्हणून पाठवत आहात कृपया ती पाठवू नये, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना केली आहे.

आई कधीच लेकराच्या ताटातील घेत नाही

पंकजा म्हणाल्या, या नोटीससंदर्भात कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. वकिल, सीए आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. यावर निश्चितच मार्ग निघेल. पण, आपण आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी, भविष्यासाठी जमा केलेला पैस मला देऊ नका. मी आज तुमच्यासाठी आईच्या भुमिकेत आहे. आई कधीही लेकराच्या ताटातील ओढून घेत नाही. त्यामुळे कृपया मला चेक किंवा पैसे पाठवू नयेत अशी आर्त साद पंकजांनी समर्थकांना केली आहे. तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी अमूल्य आहे. आपणाला मुंडे साहेबांनी दिलेला स्वाभिमानी बाणा आपण जपूया अशा शब्दांत भावना व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी समर्थकांकडून जमा होत असलेली रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST ची वक्रदृष्टी, संकटसमयी बहिणीच्या मदतीला धावून जाणार धनुभाऊ

Tags

follow us