Download App

‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून मुंडे समर्थक आक्रमक; शिंदेंचे जिल्हाप्रमुख खांडेंचं ऑफिस फोडलं

Pankaja Munde चे समर्थक खाडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खाडे यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे.

Pankaja Munde Supporters aggressive broke khade office viral audio clip : बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade) यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये वातावरण तापले असून महायुतीमध्ये संकट निर्माण झालं आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये निवडणूक काळात खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असताना बंजरंग सोनवणे यांना कशी मदत करायची? हे तो कार्यकर्ता खाडे यांना सांगत आहे. त्यामुळे महायुतीने पंकजांच्या विरोधात काम केल्याचं उघड झालं. त्यावरून पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पडद्यामागे हालचाली सुरु, शिंदे गटाला फक्त ‘इतके’ मंत्रिपद?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. या निवडणुकीत भाजपच्या (BJP) अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. बीडमध्ये मोठी ताकत असलेल्या पंकजा मुंडेंनाही (Pankaja Munde) 6 हजार मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटल्यानंच महायुतीमधील काही घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

अहमदनगर मनपाचे आयुक्तच लाचखोरीच्या जाळ्यात ! कर्मचाऱ्यामार्फत बिल्डरला आठ लाख मागितले

सोनवणेंसाठी लावली फिल्डिंग…
तर दुसरी ऑडिओ क्लिप मतमोजणीनंतरची आहे. या क्लिपमध्ये म्हाळसा जवळा या आपल्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामहून लीड दिला. कारण ओबीसी मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो, हे सांगत बीड विधानसभा मतदारसंघातील सर्वच बूथवर बजरंग सोनवणे यांच्यासाठी आपण फिल्डिंग लावल्याचं खांडे सांगत आहे.

दरम्यान, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्यावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. सध्या कुंडलिक खांडे यांचा फोन बंद असून तो माझा आवाज नाही, असं खांडे यांच्याकडून सांगितलं जात आहे.

follow us