Parbhani Hingoli MLC Election: राज्यातील 11 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून (Parbhani Hingoli MLC Election) शिंदेसेनेचे सईद खान (Saeed Khan) हे निवडून आलेले आहेत. माजी खासदार व शिंदेसेनेचे आमदार भावना गवळी यांचे ते निकटवर्तीय आहेत. एका प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात सईद खान आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जवळ ते गेले आहेत. आता थेट विधानपरिषदेत गेले आहे. सईद खान कोण आहेत. त्यांनाच शिंदेंनी विधानपरिषदेवर का पाठविले हेच या व्हिडिओतून पाहुया…
हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सईद खान हे सहज निवडून आले आहेत. त्यांना 242 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना 159 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांना 56 मते मिळाली आहेत.
सईद खान कोण आहेत ?
यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील मोठे कंत्राटदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांच्या जवळचे ते कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि माजी खासदार व सध्याच्या विधानपरिषद सदस्य भावना गवळी यांचे विश्वासू झाले. शिवसेनेच्या संघटनात्मक कामात ते सक्रीय होते.
मनी लाँड्रिंगप्रकरणी गोत्यात
2020 मध्ये शिवसेनेच्या तत्कालीन खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉड्रिंगचे एक प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी उचलून धरले होते. त्यानंतर ईडीने भावना गवळी, सईद खान यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आली होती. तर सईद खान यांना ईडीने अटक केली होती. त्यांची चार कोटींचे संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. जमीन मंजूर झाल्यानंतर सईद खान हे पुन्हा शिवसेनेत सक्रीय झाले.
दु:खद घटना! इमारतीला आग लागल्याने 15 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांनी इमारतीवरुन मारल्या उड्या
पाथरी विधानसभेची निवडणूक लढले पण
2024 मध्ये सईद खान यांनी परभणीतील पाथरी मतदारसंघातून नशिब अजमावले होते. ते राष्ट्रीय समाज पक्षाकडून रिंगणात उतरले होते. त्यांना 54 हजार मते मिळाली होती. एकेकाळचे राजकीय गुरु बाबाजानी दुर्राणी यांना त्यांनी चौथ्या स्थानावर फेकले होते.
Video : ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
श्रीकांत शिंदे यांच्या जवळ गेले अन् खास झाले
विधानसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा शिवसेनेत आले. त्यानंतर भावना गवळी यांचे राजकीय पुनवर्सन झाले. शिवसेनेत काम करत असताना सईद खान हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळ गेले. त्यातून श्रीकांत शिंदे खास मित्र झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांना मानसपूत्र म्हणू लागले. त्याचा राजकीय फायदा सईद खान यांना आता झाला आहे. भावना गवळी या विधानपरिषदेवर आहेत. त्याच सभागृहाचे आता सईद खान सदस्य झाले आहेत.
शिंदेंना सापडला मुस्लिम चेहरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व जातीय धर्मांना जवळ करून राजकारण करत आहे. मराठवाड्यात मुस्लिम व्होट बँक मोठी आहे. ही व्होट बॅंक आकर्षित करण्यासाठी शिंदेंना मुस्लिम चेहरा हवा होता. सईद खान यांच्या रुपाने हा चेहरा शिवसेनाला मिळाला हे नक्की.
