Parth Pawar’s influence is growing in NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार (Parth Pawar) यांचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये त्यांच्या मर्जीतील चेहरे पुढे येत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्षपदावरील नियुक्त्यांनंतर आता पार्थ पवार यांचे लक्ष मुंबई अध्यक्षपदाकडे असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही. मात्र, आता या पदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. झिशान सिद्दीकी हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या संभाव्य नियुक्तीकडे विशेष राजकीय अर्थाने पाहिले जात आहे.
पार्थ पवारांचा संघटनात्मक निर्णयांमध्ये वाढतोय प्रभाव?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात आली. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत पार्थ पवारही पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
हायकोर्टही राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही – सिब्बल
पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये पार्थ पवार यांच्या भूमिकेची चर्चा होत असताना आता मुंबई अध्यक्षपदासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती झाल्यास मुंबईतील राष्ट्रवादीची संघटनात्मक धुरा पार्थ पवार यांच्या प्रभावाखाली जाणार का, याची चर्चा रंगू शकते.
आधी अंतर्गत मतभेद, आता पार्थ पवारांचा प्रभाव
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीवरून काही काळापूर्वी पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या यादीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे होती; मात्र त्यांच्या नावांसमोर पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती.
रीलस्टार तरुण निघाला ऑनलाइन फसवणुकीचा मास्टरमाईंड; 10 कोटी 74 लाख रुपये उकळले!
आता मात्र पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये पार्थ पवारांची भूमिका किती निर्णायक ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
