Pathardi Apmc Election : पाथर्डी बाजार समितीमध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे यांच्या गटामध्ये दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत ढाकणे यांनी जवळ जवळ सर्वच ठिकाणी नवीन उमेदवार दिले आहेत. तब्बल पंधरा संचालकांना ढाकणे यांनी डिच्चू दिला आहे. आपल्याच संचालकांना ढाकणे यांनी दिलेल्या धक्काची जोरदार चर्चा राजकारणात सुरू आहे.
थोरात-विखेंमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष !
पाथर्डी बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११८ इच्छूक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे अठरा जागांसाठी ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. पारंपरिक एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले राजळे गट व ढाकणे गट या निवडणुकीत आमने-सामने आहे.
रोहित पवारांना धक्का देणाऱ्या तालुकाध्यक्षाची हकालपट्टी !
सत्ताधारी असलेल्या ढाकणे गटातील विद्यमान संचालकापैकी हमाल मापाडीमधून एकमेव संचालकाला पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोळा पैकी पंधरा विद्यमान संचालकाला डिच्चू देण्यात आला आहे. तर राजाळे गटाचे असलेले दोन संचालक त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली.
विद्यमान अठरा संचालकापैकी आठ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकालाच उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळ व प्रताप ढाकणे प्रणित जगदंबा महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे.