Patole VS Vadettivar in Congress : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपुर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी याची चांगलीच प्रचिती आली कारण थेट सत्यजित तांबेंच्या उमेदवारी वरूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तांबे पिता-पुत्र आमनेसामने आले होते. त्यातून बंडखोरी, निलंबन आणि प्रदेशाध्यक्षांशी असलेला वाद असं सगळं काही पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. यावेळी हा वाद आहे तो कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून त्यांच्यात या वादाला सुरूवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या गटाविरूद्ध कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्तवाखाली सर्वपक्षीय आघाडी उभी राहिली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार देवतळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Shinde VS Thackery : सत्ता संघर्षाचा निकाल शिंदेंच्या विरोधात येणार? मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र
त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर आली. ते म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी अशी युती झाली आहे. तर मग सर्वांवरच कारवाई करावी लागेल. असा पवित्रा वडेट्टीवार यांनी घेतलं. त्यावर नाना पटोलेंनीही वडेट्टीवारांवर निशाणा साधला. पटोले म्हणाले वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर आम्ही एका बंद खोलीत याबाबत चर्चा करू. वडेट्टीवार हे काही इतके मोठे नाहीत की त्यावर मी इथं बोललं पाहिजे.
वडेट्टीवार इतके मोठे नाहीत.. चिडलेल्या पटोलेंचा पलटवार; पाहा, काय घडलं ?
त्यामुळे आता महाराष्ट्र कॉंग्रेसमधील कोणता गट सरस ठरेल? कोण कोणावर बाजी मारेल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र निवडणुकांमध्ये याचे रूपांतर उमेदवारांच्या पाडापाडीमध्ये झाले तर महाराष्ट्रात कॉंग्रेसला याची मोठी किंमत चुकवावी लागेल हे मात्र नक्की.