वडेट्टीवार इतके मोठे नाहीत.. चिडलेल्या पटोलेंचा पलटवार; पाहा, काय घडलं ?

वडेट्टीवार इतके मोठे नाहीत.. चिडलेल्या पटोलेंचा पलटवार; पाहा, काय घडलं ?

Vijay Wadettiwar vs Nana Patole : काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील सुप्त संघर्ष बाहेर येताना दिसत आहे. या दोन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पटोले सातारा येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर पटोले म्हणाले, आम्ही एका बंद खोलीत याबाबत चर्चा करू. वडेट्टीवार हे काही इतके मोठे नाहीत की त्यावर मी इथं बोललं पाहिजे.

पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षणमंत्र्यांची माहिती

काय म्हणाले वडेट्टीवार ?

आमच्या सगळ्याच नेत्यांनी जिभेवर संयम ठेवायला हवा. महाविकास आघाडी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आता कुणीही तोडण्याची भाषा करू नये. जोडण्याची भाषा करावी. त्यांनी कुणाचेही नाव न घेता वक्तव्य केले असले तरी त्यांचा रोख काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडेच होता अशी चर्चा आहे. सध्या राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याची कुणाचीही ताकद नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांपैकी कोणत्याही पक्षात स्वबळावर राज्यात सत्ता आणण्याची ताकद नाही. त्यामुळे निवडणुका या तडजोडीनेच लढाव्या लागतात, असे वडेट्टीवार म्हणाले होते.

चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Market Committee Elections) अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशी युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी कारवाईही केली होती. या मुद्द्यावर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला.

वडेट्टीवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. आपसात ताळमेळ करुन त्या लढल्याा जातात. कारवाई करायचीच असेल तर सर्वांवर कारवाई करावी लागेल. सहकार क्षेत्रात कारवाई करत असताना ती विचार करून केली पाहिजे, असे म्हणत त्यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube