Download App

लोकसभेच्या निकालापूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्याला केलं राष्ट्रीय कार्याध्यक्ष

Sharad Pawar यांनी लोकसभा निकालापूर्वीच मोठा निर्णय घेतला. पक्षाच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.

Image Credit: letsupp

PC Chacko National Working President of Sharad Pawar party : लोकसभेच्या निवडणुकीसाठी ( Loksabha Election ) आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष 4 जूनला लागणाऱ्या लोकसभेच्या निकालाकडे लागले आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ( Sharad Pawar ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज

शरद पवार यांनी माजी खासदार पी.सी.चाको ( PC Chacko ) यांना सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. तसेच राजीव झा यांची पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार पी.सी.चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय-धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही सन्माननीय नेतृत्वांचे सहकार्य निश्चित मिळेल, असा विश्वास आदरणीय खा. शरद पवारांनी व्यक्त केला आहे. तसेच सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.’

Maharashtra Exit Poll : सांगलीत ‘नो मशाल’ ओन्ली ‘विशाल’; मविआत काँग्रेसने केली खेळी

कोण आहेत पी.सी.चाको?

पी.सी.चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आहेत. 2021 पर्यंत त्यांनी काँग्रेसच्या विविध पदांवरती काम केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सध्या ते केरळ राज्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांना आता शरद पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज