Download App

400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा, सरकार मान्य करते पण…, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी काही दिवसांपूर्वी 400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी काही दिवसांपूर्वी 400 कोटी रुपयांचा पीक विमा घोटाळा (Pik Vima Scam) झाल्याचे वक्तव्य केले होते तर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी 5000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारचं मान्य करत आहे की घोटाळा झाला आहे असं वक्तव्य शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी इंदापूर (Indapur) येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये केलं. तसेच केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही तसेच 3 ते 5 टक्के भ्रष्टाचार होतोच असं देखील कोकाटे म्हणाले होते. असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत. असेही या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. या सरकारला दोन महिने पूर्ण झाले आहे. सरकार 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते पण आज 60 दिवस झाले आहे तरीही सरकारकडून काहीच करण्यात आलेले नाही. असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच इंदापूरवर अन्याय झाला आहे. इंदापूरला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे होते. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणारा आहे. असं म्हणत त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना टोला लावला.

iPhone आणि Android वर वेगवेगळे दर का? उबर, ओलाला केंद्र सरकारची नोटीस

तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे, अंजली दमानिया आणि काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीकरांना 302 मध्ये आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पाहिजे. सरकार का? खुनी लोकांना लपवत आहे. असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

follow us