Download App

PM मोदींनी फक्त आरोपच नाहीतर चौकशीही करावी; शरद पवारांचं खुलं आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आरोपच नाहीतर चौकशी करावी, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशात आयोजित कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मोदींनी केलेल्या आरोपांनंतर आता शरद पवारांनी मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. इंडिया परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत शरद पवार बोलत होते.

8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’

शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील भोपाळच्या कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळी मोदींनी राज्य सहकारी बॅंक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोटाळ्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी जिथं गैरवापर होत आहे, त्याची सखोल माहिती घेऊन चौकशी करावी, असं शरद पवार म्हणाले आहेत.

राऊतांच्या गडाला CM शिंदेंचा सुरुंग; अत्यंत विश्वासू सहकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आला होता. तसेच शरद पवारांच्या पक्षावर 70 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असून असं कोणतंही क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलं नाही की जिथे घोटाळा केलेला नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.

फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना हवी ती माहिती मिळू शकते, त्यामुळे त्यांनी ज्या क्षेत्रात गैरवापर, घोटाळा केला जात आहे, त्या क्षेत्राची, विभागाची माहिती घेऊन संबंधितांची चौकशी करावी, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे.

आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी देशभरात वज्रमूठ तयार केली असून सर्वच भाजपविरोधी पक्षांना सोबत घेतल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे. जेव्हापासून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची स्थापना झालीयं, तेव्हापासून भाजपनेही विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यावर अधिकच जोर दिल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या टीकेवर विरोधकांच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags

follow us