राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शरद पवार यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे रिंगणात
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाकडून शरद पवार यांच्या विरोधात ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर.
candidate from Eknath Shinde’s Shiv Sena against Sharad Pawar? : महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढताना दिसून येत आहे. येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून महाराष्ट्रातून एकूण सात जागांसाठी सदस्य निवडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता हे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता मजबूत मनाली जात आहे. महाविकास आघाडीकडून मात्र मोठा राजकीय डाव टाकत शरद पवार यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट शरद पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची रणनीती आखात असल्याचे सांगितले जात आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात होणार मोठा खुलासा, VSR कंपनी मालक रोहित सिंह CID कार्यलयात
शिवसेना शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी अनेक इच्छुक नेत्यांची नावं समोर आली होती. यात राहुल शेवाळे, शायना एनसी, ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन कीर्तिकर, आनंदराव आडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय मंडलिक या नावांची चर्चा सुरू होती. मात्र आता ज्योती वाघमारेंच्या नावावर शोककामोर्तब झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, राजांनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 6 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार असून 9 मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. तर 16 मार्च रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत मतदान पार पडणार असून त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे.
