Download App

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचे पुणे दौरे वाढले; उद्धव ठाकरेंनी सांगितला अर्थ…

Uddhav Thackeray On Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या पुण्यामध्ये वाढत असलेल्या दौऱ्यांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ठाकरे विधानभवनामध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवरुन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मणिपूर घटनेवरुन केंद्रातील भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे.(Pm Narendra Modi Amit Shah’s visits to Pune increased Meaning by Uddhav Thackeray manipur haryana violence)

भिडेंवरून फडणवीस-पृथ्वीराज चव्हाण भिडले! गुरुजी, बाबा नावावरून एकमेंकाना थेट पुरावेच मागितले

यावेळी उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पुण्यात येऊन गेले आहेत, त्यापाठोपाठ 26 ऑगस्टला देशाचे गृहमंत्री अमित शाहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत, तर त्याचं काय कारण असू शकतं? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पुन्हा येईन पुन्हा ये येईन असं असेल कदाचित असं म्हणत मिश्किल टिपणी करत त्यावर जास्त बोलणं ठाकरेंनी टाळलं आहे.

नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !

त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मणिपूर आणि हरियाणामधील घटणांकडे लक्ष वेधून हेच आपलं रामराज्य आहे का? मणिपूर आणि हरियाणामध्ये जशा पद्धतीनं राज्य कारभार चालू आहे, त्या ठिकाणी सरकार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मणिपूरचा विचार केला तर त्या ठिकाणी महिला राज्यपाल आहेत त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. तरी देखील त्या राज्यामध्ये महिलांवर अशा पद्धतीनं अन्याय, अत्याचार होत असेल तर त्यावर काय बोलावं हेच समजत नाही.

मणिपूर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, तरीही ही परिस्थिती आटोक्यात आणण्यामध्ये डबल इंजिन सरकार का कमी पडत आहे, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ठाकरे म्हणाले की, भाजप सरकारं चालवू शकत नाही, हे या घटनांवरुन सिद्ध झालं आहे. मणिपूर आणि हरियाणा या राज्यांमध्ये शांततेसाठी कोणीही काहीही करताना दिसत नसल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ते त्यावर काहीतरी बोलतील पण तसं झालं नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये महिलांचा सन्मान केलेलं दिसत नाही असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us