Download App

साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबाला भोवले; पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई : काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी शिर्डीच्या साईबाबा (Sai Baba) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (controversial statement) केले होते. धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी बागेश्वर बाबा यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली होती. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे.

ठाकरे गटाच्या युवा सेनेने बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शिर्डीच्या साईबाबांवर बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा साईभक्तांनी निषेध केला होता. राजकीय क्षेत्रातून देखील मोठी टीका केली जात होती. भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात येत होती.

Aashish Deshmukh : राहुल गांधी अन् पटोलेंवरील वक्तव्य भोवणार; देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

बागेश्वर बाबांविरोधात ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (उद्धव गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता.

आचार्य धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांबाबत वादग्रस्त विधान केले होते. शास्त्री म्हणाले होते की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह होऊ शकत नाही. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, परंतु देव होऊ शकत नाहीत. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे, त्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील भक्तांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आमचे परात्पर गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नव्हता. ते म्हणाले की, शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे प्रत्येक सनातनीने त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Tags

follow us