Aashish Deshmukh : राहुल गांधीवरील वक्तव्य भोवणार; देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

Aashish Deshmukh : राहुल गांधीवरील वक्तव्य भोवणार; देशमुखांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

Congress Leader Aashish Deshmukh :  काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची माहिती आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आशिष देशमुख यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते आहे.

कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती.  या बैठकीतच आशिष देशमुख यांच्यावरील कारवाईचा निर्णय झाल्याची शक्यता आहे. अद्याप काँग्रेस पक्षाकडून याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला

आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ओबीसी समजाची माफी मागावी असे विधान केले होते. 2019 मध्ये राहुल गांधींच्या  तोंडून काही शब्द गेले असतील आणि त्यामुळं ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील ओबीसी समुदायाला वाईट वाटलं असेल तर त्यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण, एखाद्या समाज घटकाला चोर म्हणणं हे योग्य नाही, असं देशमुख म्हणाले होते. यावरुन पक्षातच दुफळी दिसून आली होती.

Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

याआधी देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले होते. पटोले यांच्यावर काही आरोप देशमुख यांनी केले होते.  कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची दाणादाण उडत असल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी 2019 साली तेव्हाचे मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube