Download App

karnatak asembly election 2023 : कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग, कॉंग्रेसने सर्व आमदारांना बेंगळुरूला बोलावलं

karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम राहणार की भाजप पुन्हा सत्तारुढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसने पहिली खेळी खेळली असून काँग्रेसच्या सर्व आमदारांना बेंगळुरूला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

10 मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याचा दावा करण्यात आला होता. मतमोजणीनुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती पाहता काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्र बोलावण्यात आले आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून त्यांना एकत्र ठेवण्याचा नियम आहे. त्यानुसार काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांना बेंगळुरूला बोलावले आहे. आमदारांना बेंगळुरूला नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच विशेष निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा भाजप करत आहे. मात्र, हा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी फेटाळून लावला आहे. “कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने जनतेला पाच मोठी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करायची? त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत. कारण ज्या पद्धतीने ‘एक्झिट पोल’ समोर आले आहेत, त्यानुसार उद्या 6 कोटी कन्नडिग जिंकणार आहेत, असा आमचा विश्वास आहे. हा विजय त्या सर्वांचा आहे ज्यांनी 40 टक्के भ्रष्टाचाराचा पराभव केला आणि काँग्रेसच्या पाच आश्वासनांवर विश्वास ठेवला. या पाच योजना कशा राबवायच्या? त्यामुळे आम्ही बैठका घेत आहोत. कर्नाटकातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. कर्नाटकच्या नवीन भविष्यासाठी उद्याचा सूर्यप्रकाशाचा पहिला किरण असेल.”

Parineeti Chopra Raghav Chadha : ठरलं तर! राघव परिणीतीची एंगेजमेंट होणार धुमधडाक्यात, Video Viral

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, हा दावा काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी फेटाळला आहे. आम्ही आमचे काम करत आहोत, निवडणुकीचा निकाल येईपर्यंत वाट पाहा, असे त्यांनी शुक्रवारी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

Tags

follow us