Praful Patel On Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. तशी संधीही पवारांना चालून आली होती. दरम्यान, पवारांना चालून आलेल्या संधीविषयी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य केलं. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी मनाची अर्धी तयारी केली होती, मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. पीएम बनण्याची संधी चालून होती, तेव्हाही त्यांनी शेवटच्या क्षणी नकार दिला. शरद पवार अंतिम क्षणी निर्णय घेऊ शकत नाही, असं पटेल म्हणाले.
Video Viral : ढोल पथकातील महिलेचा व्हिडीओ व्हायरल; मात्र नेटकऱ्यांनी धरले धारेवर
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 2 जुलै 2023 रोजी अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले. यानंतर त्यांनी काका शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षातील सर्वच बड्या नेत्यांनी शरद पवार यांना नेतृत्व स्वीकारण्यासोबतच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं होते, त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्यासाठी अर्धे मनाची तयारी झाला होती. परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला.
कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!
पटेल म्हणाले की, शरद पवार शेवटच्या क्षणी मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत. 1996 मधील एका घटनेची आठवण करून देताना पटेल म्हणाले की, सीताराम केसरी यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस खासदारांनीही शरद पवारांना नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते, त्यावेळीही त्यांना ते मान्य नव्हतं आणि शरद पवार पंतप्रधान होण्यापासून मुकले.
1996 ची घटना काय होती?
1996 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हतं. राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून अटलबिहारी वाजपेयी यांनी 13 दिवसांसाठी अल्पमतातील सरकार स्थापन केले. बहुमत न मिळाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर राष्ट्रीय आघाडी, डावे पक्ष आणि इतर पक्षांनी मिळून संयुक्त आघाडीची स्थापना केली. संयुक्त आघाडीचे 192 खासदार होते. सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने संयुक्त आघाडीला पाठिंबा दिला आणि एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले.
पटेल म्हणाले की, जेव्हा सीताराम केसरी यांनी अवघ्या 10 महिन्यांनंतर देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेस खासदारांमध्ये नाराजी वाढली. पक्षाच्या बहुतांश खासदारांनी शरद पवार यांना काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते. देवेगौडा यांनी खुद्द शरद पवार यांना काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिलं होतं. या निर्णयाला शरद पवारांनीही सहमती दर्शवली, मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी नकार दिला.
इंडिया आघाडीत फक्त फोटो सेशन
प्रफुल्ल पटेल यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. नरेंद्र मोदींना विरोध करण्याच्या नावाखाली पक्षांचे नेते एका व्यासपीठावर एकत्र आले, पण पुढे जाण्याचा त्यांचा कोणताही प्लॅन नव्हता, असा दावा त्यांनी केला. पाटणा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीत मी शरद पवारांसोबत उपस्थित होतो. ती बैठक केवळ फोटो सेशनचा कार्यक्रम बनून राहिली, अशी टीका पटेलांनी केली.