Download App

Praful Patel : शपथविधीनंतर पवारांना भेटून माफी मागितली पण… पटेलांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Praful Patel : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांनी मुलाखती दरम्यान एक राष्ट्रवादीमधील बंडानंतर घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की, शपथविधीनंतर आम्ही पवार साहेबांची माफी मागितली. त्यांना आमच्यासोबत राहण्याची विनंती केली. पण त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं. तो होकार त्यांच्याकडून आला नाही. असा किस्सा प्रफुल पटेल यांनी सांगितला. ते एबीपी माझा या वाहिनीशी मुलाखती दरम्यान बोलत होते.

Kanni Song: मैत्रीचा अर्थ `यारा रे’ सांगणार, ‘कन्नी` चित्रपटाचे दुसरे साँग रिलीज

पटेल म्हणाले की, दोन जुलैला अजित पवार आणि आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 16 जुलैला आम्ही पवार साहेबांना भेटायला यशवंतराव चव्हाण सेंटरला गेलो होतो. त्यानंतर 17 जुलैला आम्ही पुन्हा एकदा सर्व आमदारांना घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही विनंती करायला गेलो होतो की, साहेब जे काही झालं ते माफ करा. तसेच तुम्ही आमचे मार्गदर्शक आमचे नेते म्हणून आमच्या सोबत राहा. ही भूमिका घेऊन आम्ही गेलो होतो. मी आणि अजित पवारांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

CM Shinde यांच्याकडून श्रीकांत शिंदेंसाठी फिल्डिंग; मतदारसंघात हॉस्पिटलच्या भूमिपूजनासह आरोग्य सेवांचं लोकार्पण

त्यावेळी पवार साहेब व सर्वांशी बोलले. सर्व काही ऐकून घेतलं. हसून बोलले, प्रेमाने बोलले पण शेवटी त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं तो होकार त्यांच्याकडून आला नाही. त्यामुळे अद्याप देखील आम्ही आमची दार बंद केली नाहीत. पण शरद पवारांचं मनमोकळा आहे की, नाही हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र आमच्यापैकी कोणालाही वाटत नाही की, पवार साहेब आणि आमच्यात अशा प्रकारचा राजकीय दुरावा निर्माण झाला पाहिजे. कारण वैयक्तिक स्तरावर तर माझा स्वभाव तसा नाही. मी कधीच कुणाबरोबर वैयक्तिक टीका करत नाही. पण राजकीय भूमिकांमध्ये सरमिसळ चालत नाही. नाहीतर आपणच तोंड घाशी पडतो त्यापेक्षा स्पष्टता असणे गरजेचे आहे.

दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. तर पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमने-सामने असणार आहेत. कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून दोन्ही गटांनी विशेषतः सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांवर चांगलाच निशाण देखील साधलाय.

follow us