Prakash Aambedkar : मर्डर केल्यानंतर माणूस भाजपमध्ये स्वच्छ होतो; आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Aambedkar On BJP :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एखाद्याचा मर्डर केलेला व्यक्ती जरी भाजपमध्ये गेला तरी तो स्वच्छ होतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी ते बुलढाणा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 16T103616.285

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 16T103616.285

Prakash Aambedkar On BJP :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एखाद्याचा मर्डर केलेला व्यक्ती जरी भाजपमध्ये गेला तरी तो स्वच्छ होतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी ते बुलढाणा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यावरुन देखील प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लक्ष केले आहे. उद्या मुश्रीफ जर भाजपमध्ये गेले तर त्यांचे सर्व गुन्हे माफ होऊन जातील. त्यांच्याकडून चुकून झाले होते, असे भाजपवाले म्हणतील, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा

एखादा व्यक्ती जर भाजपमध्ये गेला तर तो धुतल्या तांदळासारखा पांढरा शुभ्र होतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे. हसन मुश्रीफ जर भाजपमध्ये गेले तर त्यांच्याकडे काहीच मिळाले नाही, असे भाजपवाले म्हणतील. जसे लोक गंगेमध्ये अंघोळ केल्यानंतर म्हणतात की आपण स्वच्छ झालो. तसे हे लोक भाजपमध्ये गेले की म्हणतात आपण स्वच्छ झालो, असे म्हणत आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Delhi Capitals New Captain : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा

दरम्यान, गेल्या काही वर्षात ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यातील काही नेते हे भाजपमध्ये आल्याचे पहायला मिळाले आहे. त्यावरुन विरोधी पक्ष भाजपला वॉशिंग मशीन असेही म्हणतात. त्यांच्याकडे जो गेला तो स्वच्छ होऊन जातो,  अशी टीका विरोधी पक्षाकडून भाजपवर करता येते.

Exit mobile version