Download App

आंबेडकरांना महाविकास आघाडीत जमेना! आता थेट भुजबळांना खुणावले

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar Advice to Chhagan Bhujbal : आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या कामाला लागली आहे. अलीकडेच महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बुहजन आघाडीचा (Vanchit Buhjan Aghadi) समावेश झाला आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावर एकमत होत नसल्यानं आंबेडकरांनी आपली नाराजी बोलून दाखवली. चादर पाहून पाय पसरावे, असा सल्ला त्यांनी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाला दिला होता.दरम्यान, आता आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना खुणावत वेगळेच संकेत दिले आहेत.

अभिषेकची विश्वासघाताने हत्या, बदनामीचे प्रकार थांबवा; विनोद घोसाळकरांची कळकळीची विनंती

छगन भुजबळ हे सरकारमधील मंत्री असून ते गेल्या काही दिवसांपासून नाराज आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीला भुजबळांना विरोध केला होता. तरीही सरकारने मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सरकारने सगेसोयऱ्यांनाही कुणबी नोंदी देण्याचा जीआर काढला. त्यामुळं भुजबळ चांगलेच संतापले आहे. अशातच ते ओबीसींचा पक्ष काढणार असल्याचं बोलल्या जातं. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं. भुजबळांनी ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे, असं ते म्हणाले.

Ind Vs Aus : भारताची सुरुवातच खराब, अर्शीन तंबूत माघारी परतला 

आज माध्यमांशी संवाद साधतांना आंबडेकर म्हणाले, ओबीसी नेते पक्ष काढत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही त्यांना सामाजिक राजकीय मदत करायला तयार आहोत. छगन भुजबळ वंचित बहुजन आघाडीचा सल्ला मान्य करतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो, असं आंबेडकर म्हणाले.

ओबीसी संघटनेचे नेतृत्व भुजबळांना करावं, असा सल्ला देत आम्ही पक्ष म्हणून मदत करायला तयार आहोत, असं आंबेडकर म्हणाले. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल आणि कोणासोबत असेल? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us