Ind Vs Aus : भारताची सुरुवातच खराब, अर्शीन तंबूत माघारी परतला

Ind Vs Aus : भारताची सुरुवातच खराब, अर्शीन तंबूत माघारी परतला

IND Vs Aus : आयसीसीच्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची खराब सुरु झाली आहे. 254 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताची इनिंग सुरु झालीयं. सध्या 5 षटकांनंतर भारताच्या 10 धावा झाल्या आहेत. पहिल्या 5 षटकांतच भारताला पहिला धक्का बसला आहे. तिसऱ्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर भारताची पहिली विकेट पडली आहे. अर्शिन कुलकर्णी झेलबाद झाला आहे. अर्शिनने 6 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा केल्या आहेत. पहिल्या विकेटनंतर आता आदर्श सिंह आणि मुशीर खान यांची जोडी मैदानात आहे.

सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली…

आयसीसी अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. हा ब्लॉकबस्टर सामना विलोमूर बेनोनीमध्ये पार पडत आहे. ICC अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Pakistan Elections : पाकिस्तानात पुन्हा मतदान! ‘या’ मतदान केंद्रांवर फेर मतदानाची आयोगाची घोषणा

भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गारद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत 7 गडी गमावून 253 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ह्यू वायबगेनने 48 धावा केल्या. तर हॅरी डिक्सनने 42 धावांची खेळी केली.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाकडून हरजस सिंगने सर्वाधिक 55 धावा केल्या असून भारतासाठी वेगवान गोलंदाज राज लिंबानी याला तीन यश मिळाले. नमन तिवारीने दोन गडी बाद केले. सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला 254 धावांचा पल्ला गाठायचा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज