‘बँकेत पैसे ठेवलेत? ताबडतोब काढून घ्या’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर इशारा, म्हणाले- ‘बँका बुडणार’

Prakash Ambedkar on Banks: प्रकाश आंबेडकारांनी देशातील नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे ताबडतोब काढून घेण्याचा सल्ला दिला आहे.

Prakash Ambedkar on Banks

Prakash Ambedkar on Banks

Prakash Ambedkar on Banks: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 2 ऑक्टोबर 2026 रोजी X वर एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. यात त्यांनी देशातील नागरिकांना बँकेत ठेवलेले पैसे ताबडतोब काढून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्या अलीकडील मुलाखतीचा उल्लेख करत अर्थव्यवस्था बिघडण्याची शक्यता व्यक्त केली आणि भारत-इस्रायल संबंधांबाबत सरकारला एक विशिष्ट घोषणा करण्याची मागणी केली.

कॅप्टन स्मित मछार कोण आहेत? त्यांच्या आडनावाचा उगम आणि गुजरातशी असलेला संबंध चर्चेत

प्रकाश आंबेडकरांची पोस्ट

ज्यांच्याकडे पैसे असतील व त्यांनी ते बँकेत ठेवले असतील, तर ताबडतोब पैसे काढून घ्या. ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच मुलाखतीत सांगितले आहे की, ऑक्टोबरनंतर देशाची अर्थव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही.

जर अशी अवस्था होऊ द्यायची नसेल, तर जगात जे मित्रराष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत मैत्री कायम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुन्हा संबंध जोडणे महत्त्वाचे आहे. आम्ही सरकारला म्हणतोय की, एक घोषणा तुम्ही करा. आम्ही म्हणत नाही की, इस्रायलशी संबंध तोडा. सरकारकडून एक घोषणा अपेक्षित करतो, “खाडी युद्ध चालू असेपर्यंत इस्रायलला भारत एकही हत्यार विकणार नाही.” कारण, इस्रायलला हत्यार विकणे म्हणजे इराणविरुद्ध लढणे आहे.

 

आंबेडकर यांची ही भूमिका त्यांच्या पूर्वीच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेशी सुसंगत आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी VBA ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ‘आम्ही इराणसोबत आहोत’ असे मोठे आंदोलन केले होते. त्यावेळीही इस्रायल समर्थक धोरण सोडून इराणसोबत उभे राहण्याची आणि इस्रायलला शस्त्रविक्री थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आंबेडकर यांनी सरकारवर अमेरिकेच्या दबावाला बळी पडून परराष्ट्र धोरण आखत असल्याचा आरोप केला होता.

‘दोन पुरुषांसोबत तरुणीला पकडलं अन् मारहाण केली’; पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाच्या पुरवणी जबाबातून संशयाचा नवा धागा

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर 2026 दरम्यान न्यूयॉर्कमधील विविध कार्यक्रमांमध्ये, तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरू असलेल्या संघर्षांच्या परिणामांवर भाष्य केले. युक्रेन तसेच मध्यपूर्व आणि खाडी प्रदेशातील संघर्षांमुळे विकसनशील देशांसमोर ‘4F’ म्हणजेच Food (अन्न), Fuel (इंधन), Fertiliser (खते) आणि Finance (वित्त) यांचे संकट उभे राहण्याचा इशारा त्यांनी दिला. येत्या काही महिन्यांत जागतिक अन्नसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. प्रमुख धान्य निर्यातदार देशांकडून अपेक्षित प्रमाणात धान्याची निर्यात होऊ न शकणे आणि खतांच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ऑक्टोबरपासून निष्क्रिय रेशन कार्डांवर कारवाई, ई-केवायसी नसेल तर कार्ड बंद होण्याची शक्यता

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत इस्रायलसोबतच्या संरक्षणविषयक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचा मुद्दा इस्रायलशी राजनैतिक संबंध तोडण्याचा नसून, खाडीतील युद्ध सुरू असेपर्यंत इस्रायलला शस्त्रविक्री पूर्णपणे थांबवण्याची घोषणा भारताने करावी, अशी त्यांची भूमिका आहे. इस्रायलला शस्त्रांचा पुरवठा करणे म्हणजे इराणविरोधातील संघर्षात सहभागी होण्यासारखे असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

भारताने इराणसह मित्रराष्ट्रांशी संबंध अधिक मजबूत ठेवण्याची गरज असल्याचेही आंबेडकर यांनी नमूद केले. अशा संबंधांमुळे व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला मदत होऊ शकते, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

Exit mobile version