Download App

मोहन भागवत अन् मोदी दोघेही देशाच्या आर्म अॅक्टचे गुन्हेगार; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar On Mohan Bhagwat : नागपूरमध्ये (Nagpur)आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS)विजयादशमी (Vijayadashami)सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे दोघेही आर्म अॅक्टचे गुन्हेगार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी केला आहे.

‘पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’; ‘भाजप सोडणार’ म्हणणाऱ्यांना सुनावलं

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज विजया दशमी दसरा हा सणाचा दिवस आहे. त्यामुळे वाईट स्टेटमेंट देऊ नये. आजचा दिवस आनंदाचा आहे, त्यामुळे हा दिवस आनंदामध्येच जावा अशी अपेक्षा आहे.

पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही

त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये शस्त्रपूजन केले आणि यावेळी उपस्थित असलेल्या संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शनही केले, असे पत्रकारांनी आंबेडकरांना विचारले. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते जे काही शस्त्र वापरतात, ते लष्कराच्या काही जवानांना मिळतात. ते इतरांना मिळत नाहीत.

त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही आर्म अॅक्टचे गुन्हेगार आहेत, त्यामुळे आर्म अॅक्टनुसार या दोघांनाही अटक करावी, अशी आमची मागणी यापूर्वीही होती आणि आजही आहे, अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आयोजित करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवकांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरसंघचालकांनी मणिपूरमधील परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.

follow us