Prakash Ambedkar : जागा वाटपाचा तिढा कायम असताना आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आता महाविकास आघातील ठाकरे आणि पवारांना बाजूला सारत कॉंग्रेसला एक नवा फॉर्म्युला दिला आहे. त्यासाठी आंबेडकरांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge ) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढणार आहोत असा अल्टिमेटम महाविकास आघाडीने वंचितला दिला आहे.
पत्रात काय म्हणाले आंबेडकर?
श्री. मल्लिकार्जुन खरगे,
17 मार्चला मुंबईत भारत जोडो यात्रेच्या समारोप सभारंभामध्ये तुमची आणि राहुल गांधींना भेटून आनंद झाला. आपली विस्तृत चर्चा झाली नाही. म्हणून पत्र लिहित आहे. निवडणुकीची घोषणा झाली. तसेच महाविकास आघाडी वंचितला न बोलवता बैठका घेत आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी महाविकास आघाडीचे अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. वंचित बद्दलच्या त्यांच्या भूमिकेमुळे आमच्या या दोन्ही पक्षांवरील विश्वास उडाला आहे.
Ahmednagar : राम शिंदेंसाठी दिल्ली दूरच! ‘ही’ आहेत कारणं
वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा पक्ष फोडणाऱ्या गैर लोकशाही भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा आहे. या विचारांच्या आधारावर मी महाराष्ट्रातील सात जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचितकडून पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढे आंबेडकर म्हणाले की, त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये मिळालेल्या जागांपैकी सात जागांची यादी आम्हाला द्यावी. ज्यावर आमच्या पक्षाच्या पसंतीच्या सात जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रकारचा आणि धोरणात्मक पाठिंबा देण्यात येईल. असं म्हणत प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी आता महाविकास आघातील ठाकरे आणि पवारांना बाजूला सारत कॉंग्रेसला एक नवा फॉर्म्युला दिला आहे.
दरम्यान दुसरीकडे लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. तरी देखील (Lok Sabha Election) महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही याबाबतही अजून स्पष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) दिलेला प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा चार जागांचा प्रस्ताव वंचितला मान्य नाही. त्यामुळे जागावाटप रखडले आहे. दोन दिवसांपूर्वी मविआ नेत्यांच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला कोणताही नवा प्रस्ताव द्यायचा नाही असे ठरले होते. त्यानंतर आता वंचितला मविआने थेट अल्टिमेटमच दिला आहे.
Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा
प्रकाश आंबेडकर जर सोबत (Prakash Ambedkar) आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरलं आहे. जर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहिती समोर येत आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढणार आहोत असा अल्टिमेटम महाविकास आघाडीने दिल्याचे समजते आहे.