Download App

INDIA आघाडीत सहभाही होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आत्ता तरी आमच्यासाठी….’

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यचासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहित १२ जागांची मागणी केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेटही झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.

तर आधी तुम्ही पडला म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजितदादांचं एका वाक्यात उत्तर, ‘सोम्या गोम्याच्या….’ 

आज प्रकाश आंबेडकर हे भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यसााठी आले होते. त्यावेळी त्यांना शरद पवारांसोबत झालेल्या भेटीविषयी विचारले. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, आता आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळं कधी ना कधी औपचारिक, अनौपचारिकरित्या भेट होणारच आहे. एखाद्या भेटीविषीय स्पेक्यलेशन करायला नको. अफवा पसरवण्यात काहीह अर्थ नाही, आम्ही एकत्र येत आहोत, त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसही आहे. त्यामुळे शरद पवार यांचीही भेट होत राहणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.

कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही केलं विजयस्तंभाला अभिवादन 

विरोधकांनी आगामी निवडणुकांत भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करून विरोधकांची मोट बांधली. मात्र, अद्याप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा इंडिया आघाडीत समावेश झाली नाही. याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीतमध्ये आमचा समावेश कधी होणार, हे त्यांनीच ठरवायचं आहे. तेच तुम्हाला आमचा सहभाग कधी होणार हे सांगतील. आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारं बंद आहेत, असं आंबेडकर म्हणाले.

सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजराताला जाणार आहे, असं वृत्त आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. यावरही आंबेडकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात देशाला कसं खोकलं केलं आहे, याचा एक आराखडाचा मांडण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सत्तेत येणं, संविधान वाचवणं हा आमच्या कार्याचा भागच आहे. याशिवाय, राज्यात मराठा आणि ओबीसी यामध्ये भांडणं लावली जात आहेत. आरक्षणावरून ती भांडण वाढणार नाहीत, त्यावर योग्य तोडगा निघेल आणि राज्यात शांतता कायम कशी राहिल, हे बघणं हा आमचा यावर्षीचा संकल्प असल्याचं आंबेडकर म्हणाले

follow us