Download App

प्रकाश आंबेडकराचं ‘मविआ’सोबत पक्कं होणार, राहुल गांधींना दिलं जेवणाचं आमंत्रण

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : खासदार राहुल गांधींच (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) आता मुंबईत आली आहे. मणिपूरमधून सुरुवात झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकरांनाही (Prakash Ambedkar)भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण दिलं. उद्या आंबेडकर भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खुद्द आंबेडकरांनी दिली.

Loksabha Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे प्रशासन अलर्ट मोडवर ! टोल फ्री क्रमांकही जाहीर 

प्रकाश आंबेडकांनी एक पत्र मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिलं. ते पत्र त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं. त्यात लिहिलं की, आपल्याला INC अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून भारत जोडो न्याय यात्रेच्या समपन महासमारोहासाठी आमंत्रण मिळालं आहे 17 मार्च रोजी शिवाजी पार्कवरील कार्यक्रमाला आपण हजरही राहणार असल्याचं आंबेडकरांनी पत्रात म्हटलं.

जसंच्या तसं पत्र-
श्री मल्लिकार्जुन खर्गे,

भारत जोडो न्याय यात्रेच्या समपन महासमारोहात सामील होण्याच्या आमंत्रणासाठी मी तुमचा आभारी आहे. मी तुमचे निमंत्रण स्वीकारतो आणि 17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन.

17/03/2024 रोजी मी तुम्हाला आणि श्री राहुल गांधी यांना राजगृहात जेवणासाठी आमंत्रित करत आहे. आपण हे आमंत्रण स्विकाराल, अशी आशा.

भारत जोडो नाही, कॉंग्रेस छोडो यात्रा; भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका 

दरम्यान, याआधी भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली होती, तेव्हा राहुल गांधींनी आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र, तेव्हा आंबेडकरांनी सहभागी होण्याचं टाळलं होतं. मात्र, यावेळी आंबेडकरांना कॉंग्रेस अध्यक्ष खर्गेंनी पत्र लिहिलं आणि त्याचं निमंत्रण आंबेडकरांनी स्विकारलं.

हे निमंत्रण फक्त भारत जोडो न्याय यात्रेसाठीच असल्याची माहिती आहे. मात्र, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंना आंबेडकरांनी जेवणाचं निमंत्रण दिल्या. त्यावेळी त्यांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us