Download App

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करू, फक्त मोदींनी पैसे द्यावे; प्रकाश आंबेडकरांचा टोला

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मविआला लोकसभेच्या प्रत्येकी बारा जागा लढण्याचा फॉर्म्युला दिला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला नाही. आता महाविकास आघाडीची दिल्लीत जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे. या सर्व घडामोडींवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं.

…म्हणूनच मी संजय राऊतांचं पूर्ण नाव घेतो; नितेश राणेंनी सांगितलं कारण… 

आज माध्यमांशी बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी बोलतांना दिल्लीतील महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला आहे का? असा सवाल विचारला. त्यावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की. मला कळलं की, उद्या बैठक आहे. पण, मला आंमंत्रण मिळालं नसल्याचं ते म्हणाले.

मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं; स्वाती मोहोळ यांच्या भेटीपूर्वी नितेश राणेंचं मोठं विधान 

दिवाळी साजरी करायला पैसे द्या…
अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्या निमित्त देशात दिवाळी साजरी करण्याचं आव्हानं पंतप्रधान मोदींनी केलं. यावर बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी मोदींच्या आवाहना जोरदार टोला लगावाला. ते म्हणाले, मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे. मला सोहळ्याचं अद्याप निमंत्रण मिळालं नाही. मोदींनी २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आ्हानं केलं. याआधी मोदींना टाळ्या वाजवण्याचं, थाळ्या वाजवण्याचं आव्हानं केलं होतं, ते आमही मान्य केलं आहे. आताही आम्ही दिवाळी साजरी करू. फक्त मोदींनी सर्व गरीब लोकांना एक हजार रुपये द्यावे म्हणजे द्यावे, म्हणजे दिवाळी साजरी करता येईल, असं आंबेडकर म्हणाले.

आज सकाळी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अकोल्याची लोकसभेची जागा वंचितने लढवावी, असं वक्तव्य केलं. त्यावरही आंबडेकरांनी भाष्य कलं. ते म्हणाले, सगळ्यांना माझी ऑफर आहे… आमच्यासाठी फक्त अकोला महत्वाचं नाही. अकोलाच काय उद्या पुण्यातही मी लढू शकतो, असं आंबेडकर म्हणाले. मी लढलो किंवा नाही लढलो तरी फरक पडणार नाही. ज्यांना लढायचं, त्यांनी लढावं. मी मदत करेल. पण जागावाटपाचा काय ते सांगावं. राष्ट्रवादी किती लढणार, कॉग्रेस किती लढणार हे सांगावं. जो कुणी लढेल, त्याला जिंकून आणू हा माझा विश्वास आहे. पण आजपर्यंत महाविकास आघाडीत जागावाटप का केलं नाही याचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला सांगावं त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर कारव्यात, असं ते म्हणाले.

follow us