पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या प्रकाश पाटलांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रकाश पाटलांच्या गटाने या ठिकाणी सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला. पंढरपूर तालुका ग्रामपंचायत
निवडणुक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगतमध्ये कॉंग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांची सत्ता आली आहे. तुंगतमध्ये डॉ. अमृता रणदिवे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. यावर प्रकाश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. या निकालांमध्ये काही ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले आहेत. तर काही ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड कायम राखलेले आहेत.
दरम्यान, या निवडणुकीबाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.