Download App

Praniti Shinde यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले आमच्या मनात…

Praniti Shinde : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे म्हणाले की, प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी (भाजपने) शेवटपर्यंत प्रयत्न केला.

प्रदीप शर्मा यांचेच ‘एन्काउंटर’; अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ ते जन्मठेपेची शिक्षा

माध्यमांशी बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांना प्रणिती शिंदेच्या भाजपप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शिंदे म्हणाले की, सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी (भाजपने) शेवटपर्यंत प्रयत्न केला. ते प्रवेशासाठी येतात मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. तसेच या अगोदर देखील स्वतः शिंदे यांनीच हा गौप्यस्फोट केला होता.

लोकसभा निवडणुकीमुळे अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या ! अश्विनी भिडेंकडे मुंबई मेट्रो, इतरांच्या कुठे बदल्या?

त्यावेळी ते म्हणाले होते की, मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे. भाजपकडून मला आणि प्रणितीताईंना आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे. त्यामुळे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही भाजपकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जात आहेत. आता मी 83 वर्षांचा झालो आहे. प्रणिती सुद्धा पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

तसेच यावेळी शिंदे यांनी मनसे आणि भाजप युतीवर सुशील कुमार शिंदे यांचे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, हा इलेक्शन प्रोसेस मधला निरनिराळ्या पार्टीचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. प्रत्येक प्रत्येकाची नीती असते त्यामुळे भाजप शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करत राहणार.

follow us