Prasad Lad on Uddhav Thackeray : येत्या दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत (Congress) येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दल विचार करतील, कॉंग्रेस आणि आमच्या विचारधारेत काही फरक नाही, उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) आपल्याच विचाराचे आहेत, असं विधान शरद पवारांनी केलं. त्यावरून आता प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
शिरूरने कायम योग्य निर्णय घेतला, प्रश्न विचारणाऱ्या खासदाराला निवडून द्या -शरद पवार
प्रसाद लाड यांनी X वर एक पोस्ट शेअर करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याचं लाड म्हणाले.
वीर सावरकरांना विरोध करणाऱ्या कॉंग्रेसला धरले!
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो … म्हणणे सोडले!
कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले!
उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का?उद्धव ठाकरे यांची गत
‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’
(अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या… pic.twitter.com/hjFKsn5DYX— Prasad Lad (Modi ka Parivar) (@PrasadLadInd) May 8, 2024
लाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, वीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला धरले! माझ्या तमाम हिंदू बांधवांनो… म्हणणे सोडले! काँग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरू केले ! उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? उद्धव ठाकरे यांची गत ‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’ (अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो) अशी झालीय, अशी टीका लाड यांनी केली.
सोलापूरात काँग्रेसचे फटाके… शिंदेंना कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स?
लाड यांनी पुढे लिहिले की, शरद पवारांच्या म्हणण्यानुसार, समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? काँग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्याबाबत केलेला देश विरोधी दावा आणि कॉंग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध! हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अशी कॉंग्रेसी विचारधारेला भाजपचा कायमच विरोध असेल! पण उद्धव ठाकरेंना हे सर्व मान्य आहे का? असा सवाल लाड यांनी केला.
ठाकरेंची पार्टी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार – फडणवीस
आपला पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला असेल. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय आहे. याआधी त्यांनी अनेकवेळा पक्षा तयार केले आणि कॉंग्रेसमध्ये विलीन केल. लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, प्रसाद लाड आणि फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.