Download App

चव्हाणांची रामभक्ती, अन् दरेकरांचा खोचक टोलेबाजी; म्हणाले, ‘एका दिवसासाठी अशी नौटंकी…’

  • Written By: Last Updated:

Praveen Darekar : उद्या अयोध्यतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. विरोधकांनी या सोहळ्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याची घणाघाती टीका विरोधकांनी केली. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात बॅनर लावले. त्यामुळं चर्चांना उधाण आलं. दरम्यान, यावर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेक (Praveen Darekar) यांनी भाष्य केलं.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये झळकले अशोक चव्हाणांचे बॅनर, नेमकं चव्हाणांच्या मनात तरी काय? 

आज प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दरेकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. कॉंग्रेसकडून लावण्यात येणाऱ्या बॅनरविषयी दरेकरांना विचारले असता ते म्हणाले, प्रभू श्रीराम, राम मंदिर हे संपूर्ण देशवासियांच्या भावनेचं प्रतिक आहे. श्रध्देचं स्थान आहे. कॉंग्रेसन अशा आरत्या केल्या तर स्वागतच आहे. पण फक्त एका दिवसासाठी अशी नौटंकी नको. तर राम मंदिर, हिंदुत्व ही त्यांची सततची भूमिका असावी, असं दरेकर म्हणाले.

राऊत मुर्खासारखं बडबडतात
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात राममंदिरावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज देवेंद्र फडणवीसांनी ‘एक्स’ अकाउंटवर नागपूरहून अयोध्येला जाताना रेल्वे स्थानकावरील फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये देवेंद्र फडणवीस कारसेवकांसह दिसत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली. गेला असाल स्टेशनवर फिरायला, अशा शब्दात राऊतांनी डिवचंलं. त्यावरही दरेकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, संजय राऊत मुर्खासारखं बडबडतात. फडणवीस स्टेशवर गेले होते, ते काय चहा आणि वडापाव खायला गेले नव्हते. त्या फोटोत कारसेवक दिसत आहेत. त्यांचा आक्रमकपणा दिसत आहेत. मात्र, राऊत वाटेल ते बडबडतात, असं दरेकर म्हणाले.

हिंदूविषयी आस्था राहिली नाही
ते म्हणाले, देवेंद्रजीचं हिदुत्व, हिंदुत्ववादी भूमिका ही देशाला माहित आहे. ते कारसेवक होते हेही सगळ्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही हिंदुत्ववादी होती. मात्र, उद्धव ठकारेंची भूमिका आता ती राहिली नाही. म्हणून ते उसणं आवसान आणून टीका करतात. फडणवीसांनी फोटो ट्वीट केल्यानंतर हे जागे होऊन त्यांच्यावर टीका करतात. मात्र, जनतेच्या मनात हिंदूविरोधी हे जे मत तयार झाल आहे, ते तुम्ही असल्या टीका करून बदलू शकत नाही. त्यांना देवाविषयी, हिंदूविषयी आस्था राहिली नाही. फडवीसांनी फोटो ट्वीट केला, यांच्याकडे ट्वीट करायला काहीच नाही, हे हिंदुत्व दाखवू शकत नाही त्यामुळं टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असंही दरेकर म्हणाले.

 

follow us

वेब स्टोरीज