प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये झळकले अशोक चव्हाणांचे बॅनर, नेमकं चव्हाणांच्या मनात तरी काय?

  • Written By: Published:
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये झळकले अशोक चव्हाणांचे बॅनर, नेमकं चव्हाणांच्या मनात तरी काय?

Ashok Chavan : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. विरोधकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असेल तरी विविध पक्षांच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनवरवर त्यांनी फक्त आपले नाव टाकले. त्यावर पदाचा-पक्षाचा उल्लेख करणं त्यांनी टाळलं आहे. त्यामुळे चव्हाण पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ, जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकणी ईडीकडून समन्स, मंगळवारी होणार चौकशी 

पाच राज्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळं भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. चव्हाण यांच्या पसुरू आहेत. भाजपमधील अनेक नेत्यांनी तसे दावा केले होते. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यातच आज चव्हाण यांनी शहरात बॅनर लावले आहेत. त्यामुळं पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

“रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे” : अयोध्येतील सुप्रसिद्ध घोषणांचे शिल्पकार कोण होते? 

एरवी सत्यसाईबाबांचे भक्त असलेले चव्हाण हे देवधर्माच्या बाबतीत फारसे सक्रिय नसतात. मात्र, आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलथापालथ घडवणारी ठरते की, काय अशी चर्चा रंगली आहेत.

बॅनरमध्ये काय आहे?

अशोक चव्हाण यांच्या वतीने नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर भगवान श्रीरामाचा फोटो आहेत. तर यासोबतच महात्मा गांधींच्या भजनातील रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान या ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण हे त्यांचं नाव आहे. त्यांनी नावासोबत आपल्य कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. वास्तविक अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तरीही त्यांनी नावासोबत पदाचा उल्लेख नाही त्यामुळं आश्चर्च व्यक्त करण्यता येत आहे.

अलीकडेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी १५ दिवसांत राजकीय भूकंप होईल, असे म्हटले होते. यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणत्याही पदाच्या उल्लेखाशिवाय बॅनर झळकळ्याने चर्चांना उधाण आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज