Prithviraj Chavan On BJP : देशात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवासांपूर्वी केली होती. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही सरकारवर टीका केली. आजपर्यंत देशातील सरकारे लोकशाही आणि संविधानाच्या तत्त्वांवर काम करत होती, मात्र 2014 पासून भाजचे सरकार सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. भाजप (BJP) सरकार पुन्हा सत्तेत आल्यास देशात चीन, रशियासारखी हुकूमशाही येईल, असं विधान त्यांनी केलं.
काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेनिमित्त कोळे (ता. कराड) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, नामदेव पाटील, कोळे गावच्या सरपंच भाग्यश्री देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यासमोर कोणते प्रश्न आहेत हे सर्वसामान्यांना कळावे यासाठी भारत जोडो नंतर जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. सुमारे सात हजार शाळा खासगीकरणाकडे वाटचाल करत आहेत. गॅस आणि तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. नोकरी भरती नाही, कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत. केवळ तेलावर कर लादून मोदींनी 30 लाख कोटी रुपये उभे केले असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
ज्याला मूच-दाढी नाही असेही आमदार होतात, बाई की पुरुषही… बच्चू कडूंची वादग्रस्त विधान
सरकार हुकमशाही पद्धतीने वागते आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा निवडून आले, तर आपल्या देशात चीन, रशियासारखी हुकूमशाही येईल. आणि लोकांना कोणतेही अधिकार नसतील, अशी त्यांनी व्यक्त केली. लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्याचे हे दुसरे युद्ध जिंकलेच पाहिजे, असे आवाहन केले.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देश मोठ्या कर्जाच्या बोज्यातून जात आहे. केंद्रातील एकहाती, हुकूमशाही आणि मनमानी कारभाराचा कर्नाटकात दारुण पराभव झाला. दक्षिणेकडील राज्ये यापुढे त्या शक्तीला पाठिंबा देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपने कारस्थान रचले, आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीनेही ते फोडले. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य माणसाच्या लक्षात आल्यानं जनता त्यांना आता साध देणार नही. स्वाभिमान विकून मतदान करणार नाही, असं भावनिक प्रतिपादन चव्हाण यांनी केलं.