ज्याला मूच-दाढी नाही असेही आमदार होतात, बाई की पुरुषही… बच्चू कडूंची वादग्रस्त विधान

  • Written By: Published:
ज्याला मूच-दाढी नाही असेही आमदार होतात, बाई की पुरुषही… बच्चू कडूंची वादग्रस्त विधान

Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एकमेंकांवर थेट खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यात आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचीही भर पडली आहे. जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना ते वादग्रस्त बोलून गेले आहेत. ज्याला मूच-दाढी नाही, असेही आमदार होतात…बाई की पुरुषही कळत नाही. हिजडेही आमदार होतात, असे बच्चू कडू वादग्रस्त बोलून गेले आहेत. बच्चू कडू यांचा हा रोख अपक्ष आमदार रवी राणांकडे (Ravi Rana) होता. कारण गेल्या दोन दिवसांपासून ते एकमेंकावर थेट आरोप करत आहेत.

‘लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा..,’; Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे राजकारण पेटले आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य व बच्चू कडू यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत पैसे दिले असतील तर दोघांची चौकशी व्हावी, त्याची तक्रार मी करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले होते. बच्चू कडू हे मंत्रिपद मिळविण्यासाठी सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी केला होता. त्याला आता बच्चू कडू यांनी जळगावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात उत्तर दिले आहे.

बबन घोलप राष्ट्रवादीत जाणार? मुलाने घेतली शरद पवारांची भेट

बच्चू कडू म्हणाले, ज्याच्या बोलण्यात दम नसतो. त्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असेही लोक आमदार होतात. हिजडे सुद्धा आमदार होतात, अस वादग्रस्त वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले. परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली. आंडू ..पांडू लोकही आमदार होतात, असा माझा म्हणण्याचा उद्देश आहे, असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

तर दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार व आमदार नितेश राणे यांनीही अशीच खालची भाषा वापरली होती. रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच आहेत. त्यांना दाढी मिशाच फुटलेले नाही, असे राणे यांनी म्हटले होते. राणेंना कोंबडी आणि अंड्यात एवढा लगाव का आहे. याबाबत मला माहिती नाही. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत, अशा भाषेत रोहित पवारांनी राणेंना उत्तर दिले होते. त्यात आता खालच्या भाषेत बोलण्यात बच्चू कडू यांचीही भरच पडली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube