बबन घोलप राष्ट्रवादीत जाणार? मुलाने घेतली शरद पवारांची भेट

  • Written By: Published:
बबन घोलप राष्ट्रवादीत जाणार? मुलाने घेतली शरद पवारांची भेट

Yogesh Gholap met Sharad Pawar : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी निश्चित असल्याचं गृहीत धरून काही दिवसांपासून तयारी करणारे ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीतून उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने घोलप यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलल्या जातं. त्यांनी संपर्कप्रमुख पदाचीही राजीनामा दिला. दरम्यान, आज त्यांचा मुलगा योगेश घोलप (Yogesh Gholap) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.

वाकचौरे परत आल्यानं घोलप यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते उबाठातून बाहेर पडलील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं स्पष्ट केलं. मात्र, त्यांच्या मुलाने आज शरद पवारांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंकडून घोलपांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने योगेश घोलपांनी पवारांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे

Asia Cup : भारत विरुद्ध INDIA वादाने टीमचे अभिनंदन : मॅच संपताच नेत्यांची राजकीय बॅटिंग 

बबन घोलप हे शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनेशी जोडले गेले. त्यांना 1985 मध्ये देवळाली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. मात्र, नंतर झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी पंचवीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी समाजकल्याण मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले.

मात्र, 1999 मध्ये घोलप मंत्री असताना राष्ट्रवादीचे मुंबई सचिव मिलिंद यवतकर यांनी घोलप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याचा खटला अजूनही सुरू आहे. त्यामुळे 2014 मध्ये त्यांचा मुलगा योगेश घोलप यांना तिकीट देण्यात आले. त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांनी या मतदारसंघात पाच वर्षे आमदार म्हणून काम केले आहे.

त्यानंतर 2019 साठीही शिवसेनेने योगेश घोलप यांना उमेदवारी दिली. मात्र सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून योगेश घोलप यांचा पराभव केला. त्यानंतर बबन घोलप फारसे सक्रिय दिसले नाहीत. मात्र, आता ते सक्रीय झालेत. मात्र, वाकचौरे यांना पक्षात आणून उद्धव ठाकरेंनी घोलप यांना मोठा धक्का दिला.

त्यामुळं घोलप आणि त्यांचा मुलगा योगेश घोलप पक्षात नाराज दिसत आहेत. सध्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाचा पर्याय निवडला. अशा स्थितीत या जागेवर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हानही शरद पवारांसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईत शरद पवारांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. घोलप हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube