Download App

घोडेबाजाराची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांचे विलीनीकरणाचे वक्तव्य; चव्हाण थेट बोलले

निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.

Prithviraj Chavan on Sharad Pawar :  देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) धामधूम सुरू असतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. येत्या काळात अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य पवारांनी केलं होतं. त्यावर आता कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हा (Prithviraj Chavan यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी असं वक्तव्य केल्याचं चव्हाण म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल 

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी शरद पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं आहे, असा दावा चव्हाण यांनी केला. फक्त आपले लोक सुरक्षित राहावेत. लोकसभेला पराभूत होवोत किंवा विजयी होवोत त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीच त्यांचे प्रयत्न असू शकतात. अर्थात 4 जूननंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, असं चव्हाण म्हणाले.

माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब 

राज्यात मविआला 30 जागा मिळतील, अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. वंचितला एक टक्काही मतदान मिळणार नाही. मुस्लिमांनी व्यूहरचेनुसार मतदान कलं. साताऱ्यात उदयनराजे हरतील, पण कोल्हापुरात शाहू महाराज जिंकतील, असंही चव्हाण म्हणाले.

वंचितला एक टक्काही मते मिळणार नाही
गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या 7 टक्के मतांपैकी एमआयएमला 3.5 टक्के मते मिळाली होती. आता त्यांना एकुणात एक टक्काही मते मिळणार नाहीत. आम्ही त्यांना पाच जागा देण्यास तयार होतो. मात्र, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोलेंचा अवमान केला. आता लोकांनी त्यांच्या ऐवजी कॉंग्रेसच्या संविधान बचाव मोदी हटाव या भूमिकेला पाठिंबा दिला.

शरद पवार काय म्हणाले?
इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना शरद पवार म्हणाले, आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज पवारांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होईल का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी सांगितले की, मला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणी मानणारे आहोत, असं पवार म्हणाले.

follow us