Download App

‘हिरे उद्योग सुरतला’फडणवीसांनी खरं काय ते सांगून टाकलं; म्हणाले, ‘ही माहिती..,’

Devendra Fadnvis : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमधील सुरतला पळवले जात असल्याची झोड विरोधकांकडून उठवण्यात आली आहे. ही झोड उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. हिरे उद्योग सुरतला पळवून नेत असल्याची माहिती चुकीची असून याउलट केंद्र सरकारने मुंबई येथे अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

दूध उत्पादकांना दिलासा! सरकारकडून मिळणार प्रति लिटर 5 रुपये अनुदान, मंत्री विखेंची घोषणा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरतला हिऱ्यांची निर्मिती होत आहे. आपल्याकडे निर्यात होते. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापारी बाहेर गेलेले नसून मुंबईतील उद्योग सुरतला जातील, हे मनातून काढून टाका. मुंबईशी स्पर्धा कोणीही करू नये. मुंबईतील ज्वेलरी पार्कला जीएसटीमध्येही सवलत दिली असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता

दरम्यान, इटली आणि तुर्की या देशांपेक्षा अधिक सोयीसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मलबार गोल्ड नावाच्या कंपनीने मुंबईत १७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. ‘तुर्की डायमंड टुर्स’ ही कंपनीसुद्धा मुंबईत येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आलं आहे.

8 Doan 75 Teaser: ‘8 दोन 75′ : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा टिझर रिलीज

मागील अनेक वर्षांपासून मुंबईतून हिरे दागिन्यांची निर्यात होत होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचं कारण देत हा उद्योग जवळपास आठ महिन्यांपासून बंद ठेवला होता. अनेकदा सांगूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली नव्हती.

‘फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल, तुम्ही परवाच अध्यादेश काढा’; चव्हाणांचं CM शिंदेंच्या भूमिकेवर बोट

मुंबईत उत्पादन होत नाहीतर फक्त कागदपत्रे तयार केली जातात. याकडं तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं. मात्र कोणीही ऐकलं नाही निर्यातीत घट झाली होती. आता ही घट पूर्ववत होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us