किंग खान की प्रभास सर्वात महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या ‘या’ सिनेमासाठी किती घेतलं मानधन
Shah Rukh Khan Prabhas: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ‘डंकी’ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. ‘डंकी’ सोबतच साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Saalar Movie) हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
सोशल मीडिया (Social media) या चित्रपटांची क्रेझ लक्षात येत आहे. रिलीज होण्याआधीच शाहरुख खानचा वर्षातील तिसरा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘डंकी’ आणि प्रभासचा डार्क डिस्टोपियन ड्रामा ‘सालार’ यांच्यात चुरशीची स्पर्धा बघायला मिळणार आहे. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये (Advance Booking) दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘सालार’चे दिग्दर्शन ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केले आहे, तर ‘डंकी’ चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. अशा प्रकारे वर्षाच्या शेवटच्या दिवसात बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान विरुद्ध प्रभास असा सामना होणार आहे. पण शाहरुख खान आणि प्रभासमध्ये सर्वात महागडा अभिनेता कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? तर जाणून घ्या शाहरुख खानने ‘डंकी’साठी किती मानधन घेतलं आहे आणि प्रभासने ‘सालार’साठी किती मानधन घेतलं चला तर मग पाहुयात…
शाहरुख खानने ‘डंकी’साठी किती मानधन घेतले? ‘डंकी’मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये त्याने ‘हार्डी’ची भूमिका साकारली आहे. यापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हिट झाल्यानंतर त्याने आपले मानधन वाढवल्याची बातमी आली होती आणि त्यासाठी त्याने 100 कोटी रुपये घेतले आहेत पण रिपोर्ट्सनुसार अभिनेत्याने 29 कोटी रुपये घेतले आहेत.
प्रभासने किती पैसे घेतले? प्रभास ‘सालार’साठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या नफ्यातही त्याचा वाटा असेल आणि हा वाटा जवळपास १० टक्के असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Anushka Sharma: प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाली…
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि गौरी खान निर्मित, अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन लिखित ‘डंकी’ 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. तर प्रभासच्या ‘सालार’ भाग 1 सीझफायरचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे, यामध्ये मीनाक्षी चौधरी, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, सरन शक्ती आणि ईश्वरी राव दिसणार आहेत. 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.