Download App

‘मोदी महापुरुष, तर मंदिर बनवा’; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला उपरोधिक सल्ला

Pruthviraj Chavan News : पंतप्रधान नरेंद्र मोदी महापुरुष आहेत, तर मंदिर बनवायला सुरु करायला पाहिजे, असा उपोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची महात्मा गांधी यांच्याशी तुलना केल्याचं पाहायला मिळालं. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं होतं. त्यावरुन काँग्रेस नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशातच आज मुंबईतून संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनीही उपरोधिक सल्ला दिला आहे.

‘NCP ने सरकार पाडलं नसतं तर आरक्षण दिलं असतं’; चव्हाणांनी टाकला मिठाचा खडा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महात्मा गांधी महापुरुष तर पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष असल्याचं म्हटलं होतं. त्यावर माध्यमांमधून पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी महापुरुष आहेत, तर मंदिर बनवायला सुरु करायला पाहिजे, असं चव्हाण म्हणाले आहेत. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

दूध दरवाढीसाठी उपोषण! शरद पवारांचा पत्र धाडत उपोषणकर्त्यांना दिलासा; म्हणाले..,

नेमकं काय म्हटले उपराष्ट्रपती?
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला योग्य मार्गावर नेले आहे. एक गोष्ट सांगायची आहे, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महापुरुष होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं. तसेच महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये श्रीमद राजचंद्रजी यांची शिकवण दिसून येते असंही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडणार…
येत्या 7 डिसेंबरपासून विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधी मंडळाच्या कामकाज समितीने हिवाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत. या हिवाळी अधिवेशनात प्राधान्याने जनेतेचे प्रश्न मांडणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

भुजबळांना मत मांडायचा अधिकार…
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मतं मांडायचा अधिकार आहे. घटनेनुसार मंत्रिमंडळ मत हे सामुदायिक असतं. त्यांचं मत त्यांनी मंत्रिमंडळात मांडावे. राजकारण करायचं असेल तर दुर्दैवी आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं व्यक्तिगत मत असून ते माझे सहकारी आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. मी त्यांच्यावर टीका करणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

follow us